तुरीची डाळीच्या प्रगत जाती: आजच्या दैनंदिन जीवनात तुरीच्या डाळीचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात केला जातो. प्रत्येक दिवशी भाजी सोबत तुरीची डाळ केली जाते. तुरीच्या डाळी शिवाय आपला जेवण होत नाही.आज आपण तुरीच्या डाळी विषयी माहिती घेऊया. तुरीच्या पिकाची लागवड कशी केली जाते, किती वेळ त्याच्या उत्पादन घेण्यात लागतो आणि तुरीच्या जाती जाणून घ्या.
तुरीची निवड: तुरीची निवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार निवड करणे गरजेचे आहे. कारण भारी जमिनीत अधिक उत्पादन देणारे तुरीचे वाण हे मध्यम ते हलके जमिनीत तसेच उत्पादन देतील असे नाही. मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता कमी कालावधी परिवर्तन होणाऱ्या जाती उदाहरणार्थ, एकटी 88 11 यासारख्या वाणाची आपण निवड करू शकता. या उलट भारी जमीन असेल तर मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या म्हणजे १७० ते १८० दिवसात येणाऱ्या उदाहरणार्थ पीकेव्ही तारा बीएसएमआर ७३७ यासारख्या वाणाची आपण निवड करू शकता.
तुरीच्या जाती (Varieties)
तुरीच्या डाळीचे प्रगत जाती खलील प्रमाणे आहेत.
आय सी पी एल ८७
आपल्या राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. ही तुरीची हळवा जात आहे. ही जात खोडवा घेण्यासाठी उत्तम असल्याचा दावा केला जातो. या जातीपासून एक तरी वीस क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जाते.
राजेश्वरी
महाराष्ट्रासाठी शिफारित करण्यात आलेल्या या जातीची राज्यातील बहुतांश राज्यात लागवड केली जाते. मराठवाडा आणि विदर्भात प्रमुख तूर उत्पादक पट्ट्यांमध्ये या जातीच्या सर्वाधिक शेती होते. ही एक लवकर पक्क होणारी जात आहे. साधारणता एकशे तीस ते 140 दिवसात या जातीपासून हेक्टरी 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. या जातीची तुर लाल रंगाची असते.
एकटी 88 11
ही देखील जात महाराष्ट्रासाठी शिफारित करण्यात आली एक प्रमुख मुख्य जात आहे. या जातीत देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात लागवड केली जाते. हवामान शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. 140 ते 150 दिवसाच्या आत या जातींचे पीक पक्व होत असून यापासून हेक्टरी १६ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. उत्पन्नाच्या बाबतीत ही जात राजेश्वरी पेक्षा कमी आहे.
आय सी पी एल 87119
या जातीची महाराष्ट्रात लागवड केली जाऊ शकते. या जातीला अशा या नावाने ओळखले जाते. उशिरा पक्क होणारी ही जात शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले असून विदर्भात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही जात साधारणता १८० ते २०० दिवसात पक्क बनते आणि यापासून हेक्टरी वीस क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
विपुला
साधारणता १५० ते १६० दिवसात पक्कू बनणारा हा वान शेतकऱ्यांमध्ये अलीकडे विशेष लोकप्रिय बनला आहे. या जातीची लागवड राज्यातील मराठवाडा विदर्भ भागातील तूर उत्पादक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या जातीपासून साधारणता 25 ते 26 क्विंटर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
पीकेव्ही (तारा)
महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागत होते साधारणता 170 ते 180 दिवसात या जातीचे पीक परीपक्व बनते. या जातीपासून २० क्विंटरपर्यंतची एक तरी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.